मुंबई : सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या कालावधीत सोनं चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. (Gold Rate Today)
Ladki Bahin Yojana : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २,५०० रुपये!
मिळालेल्या माहितीनुसार, काल सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आज मंगळवार (दि. ११) रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात ८७० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर ८७ हजार ०६० रुपयांवरुन ८७ हजार ९३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर ८ हजार ७०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८ लाख ७० हजार ६०० रुपयांवरुन ८ लाख १९ हजार ३०० रुपये इतका झाला आहे.
इतर शहरांमध्ये काय आहे सोन्याचा भाव?
मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी प्रति १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा दर ८० हजार ६०० रुपये आहे. तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ८७ हजार ९३० रुपये आहे.
दरम्यान चैन्नई, कोलकाता, बंगळूरु, हैदराबाद या देशात १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ८७ हजार ९३० रुपये तर २२ ग्राम ८० हजार ६०० रुपये आहे. नवी दिल्ली येथे १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ८८ हजार ०८० रुपये तर २२ ग्राम ८० हजार ७५० रुपये आहे. तर अहमदाबाद येथे १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ८० हजार ६५० रुपये तर २२ ग्राम ८७ हजार ९८० रुपये आहे. (Gold Rate Today)