Mumbai Breaking News : महिलेचा खून करून पळालेल्या मारेकऱ्याच्या मुसक्या २ तासात आवळल्या

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे परिसरात सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता वांद्रयातच ज्येष्ठ महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेचे हात बांधून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेज सापडल्याने पोलिसांनी तपास करत मारेकऱ्याच्या मुसक्या अवघ्या २ तासात आवळल्या आहे. असे असले तरी या हत्येच्या घटनेने वांद्रे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील रिक्लेमेशन परिसरातील इमारतीत राहणाऱ्या ६४ वर्षीय रेखा खोंडेंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्याने रेखा खोंडेंचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. रेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी हा चोरीच्या उद्देशाने तीन दिवसांपूर्वी घरात घुसला होता. बंद खोलीतून कुजलेला वास येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्ब्ल दोन तासात मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या. मारेकऱ्याच नाव शहरीफ अली समशेर शेख (वय २७ वर्षे ) असून तो मृत महिलेच्या शेजारीच राहत होता. या घटनेने वांद्रे परिसर हादरलं आहे.

Comments
Add Comment

ठाणे, कडोंमपाची जबाबदारी राज ठाकरेंवर; उबाठा गट मुंबईवरच लक्ष ठेवणार!

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आज राज्यभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या