Ladki Bahin Yojana : आता 'या' लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २,५०० रुपये!

  109

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु केली. या योजनेद्वारे महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत. तर ही रक्कम वाढवून लवकरच २ हजार १०० रुपये दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेचा फायदा आता नवी दिल्लीतील महिलांना देखील होणार आहे. (Delhi Government Scheme)



सध्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आता भाजपा सरकार स्थापन होणार असून अनेक योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहेत. दिल्लीतील महिलांना आता लवकरच २५०० रुपये मिळणार आहे.


यापूर्वी आम आदमी पार्ट सरकार महिला सन्मान योजनेत दर महिन्याला १ हजार रुपये देत होती. मात्र, भाजप सरकारने २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता दिल्लीतील महिलांना पुढील महिन्यापासून २ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महिलांना २५०० रुपये देण्यास सुरुवात केली जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. त्यामुळे त्याआधी महिलांना हे पैसे मिळू शकतात.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.