Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेMumbai Local News : कल्याण लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट!

Mumbai Local News : कल्याण लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट!

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोटरमनच्या प्रसंगावधानतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.

Mumbai Breaking News : मुंबईत अग्नितांडव! ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला आग

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ( दि १० ) रात्री साडे आठच्या सुमारास सीएसएमटी वरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल डब्ब्यात एका महिलेच्या पर्समधील फोनचा स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झालेली नाही. ही घटना कळवा स्थानकात घडली.

Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी सुरुच! जाणून घ्या काय आहे आजचा भाव

या घटनेने ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत अग्निरोधकाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यान मोबाईलचा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -