प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा हे समजून काम करावे - एकनाथ शिंदे

ठाणे : एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी " प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!" समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित होते.


यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा -मोहरा बदलून " फाईव्ह स्टार " परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतल्या असून " खड्डेमुक्त बसस्थानक " हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.


एसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताण-तणाव मुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारांमध्ये वातानुकूलित, स्वच्छ व टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी एस टी प्रशासनाला दिले. खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाबाबत समाधान व्यक्त करून हे " रोल मॉडेल " संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.


यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पामध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याच्या संकल्प असून माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह