प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लागल्या वाहनांच्या रांगा
नवी दिल्ली : प्रयागराज येथे महाकुंभसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेक भाविका शाही स्नानासाठी देशभरातून येथे पोहचत आहेत. उत्तरप्रदेशमधील अनेक शहरातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मध्यप्रदेशातील खूप शहरातही स्टेशन व बसस्टँडवरही भक्तांचे लोढें लोंढे येत आहेत. गर्दीने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. वाराणसी, मिर्जापूर, लखनऊ, यासह ७ एंट्री पॉईंटवर वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी या रांगा २० किलोमीटर पर्यंत पोहचल्या होत्या. अनेक लोक तर रस्त्यावरील ट्रॅफिक जॅममध्येच अडकले आहेत. ट्रेनची अवस्थाही अशीच आहे. एसी, नॉन एसी, जनरल डबे लोकांच्या गर्दीने तुडूंब भरले आहेत.
१२ फेब्रूवारी रोजी माघी पौर्णिमा आहे. यादिवशी शाही स्नान होणार आहे. त्रिवेणी संगमात स्नान करुन पुण्य कमवण्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराजला येत आहेत. यामुळे प्रयागराजकडे येणारे सर्व रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. संगमावर पोहचण्यासाठी लोकांची होड लागली आहे. यासाठी छोटा हत्ती सारख्या टेम्पोचा वापर केला जातो. यामध्ये १० लोक बसू शकतात पण आता यात २०-२० लोक कोंबले जात आहेत. प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सर्व रस्त्यांवर ट्रॅफिक जाम लागले आहेत. रीवा येथे १० किलोमीटर, मध्य प्रदेश व उत्तरप्रदेश बॉर्डरवर अनेक रस्ते वाहनांनी खचाखच भरले आहे. जबलपूर मध्ये ४० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर सिहोरा येथे ११ किलोमीटर ट्रॅफिक जॅम लागला आहे.
माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला मीच जबाबदार – सैफ अली खान
सामान्य रेल्वे प्रवाशांना फटका
दिल्ली हावडा या रेल्वे मार्ग नेहमीच व्यस्त असतो. हजारोंच्या संख्येने या मार्गावरुन प्रवासी ये- जा करत असतात. आता यामध्ये भाविकांची भर पडली आहे त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वेत चढ- उतार करणे तर जिकीरीचे बनले आहे. अनेकांच्या रेल्वेसुद्धा चूकत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याला जाणारे भाविक सोडून इतर प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसत आहे. ३०-३० किलोमीटर चालत काही प्रवाशी प्रयागराजला पोहचले आहेत.
५ हजारांवर वाहने अडकली
रिवा शहरात कार आणि बसेसला युपी सरकारने थांबवल्या आहेत. त्यामुळे रिवा, सतना, जिल्ह्यामध्ये ५ हजारांवर गाड्या अडकल्या आहेत. अनेकांकडे खाण्याचे साहित्य आहे पण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हाल होत आहेत. याचा फायदा स्थानिक दुकानदार उठवत आहेत. चढ्या भावाने वस्तूंची विक्री होत आहे.
१३५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १० तास
वाहनांची एवढी प्रचंड गर्दी झाली आहे की रिवा शहरातून प्रयागराज हे १३५ किलोमिटर अंतर पार करण्यासाठी ८ ते १० तास लागत आहे. मंगवा, कटरा, चाकघाट, सुहागी, जसरा या प्रयागराजच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत.