Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीमाझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला मीच जबाबदार - सैफ अली खान

माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला मीच जबाबदार – सैफ अली खान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(saif ali khan) काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता.या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.या घटनेवर सैफ आली खानला हॉस्पिटलला घेऊन जाणारा ड्राइवर ते त्यांच्या कुटुंबियानी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता पहिल्यांदाच सैफ अली खानने स्वत: त्या दिवशी घडलेल्या घटनेची कहाणी सांगितली आहे. तसेच ‘माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला मीच जबाबदार’ असल्याचं सैफनं म्हटलं आहे.

चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खाननं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. होती.सैफ अली खानने सांगितले की, करीना डिनरसाठी बाहेर गेली होती आणि मी घरीच थांबलो होतो. करीना परत आल्यावर काही वेळ गप्पा मारून दोघे झोपी गेले. थोड्या वेळाने घरातील मदतनीस घाईघाईत आली आणि म्हणाली की, ‘कोणीतरी घरात शिरले आहे.’ जेहच्या खोलीत एक माणूस आहे, ज्याच्याकडे चाकू आहे आणि तो पैशांची मागणी करत आहे. सैफ म्हणाला की, त्याला वेळ नक्की आठवत नसेल, पण तेव्हा रात्रीचे २ वाजले होते.

सैफ अली खानने सांगितले की, जेव्हा तो जेहच्या रूममध्ये गेला तेव्हा सैफ म्हणाला, ‘मी घाबरून आत बघायला गेलो आणि मला जेहच्या पलंगावर एक माणूस दिसला, ज्याच्या हातात दोन काठ्या होत्या. त्या काठ्या खरंतर एक्साॅ ब्लेड होत्या. त्याच्या दोन्ही हातात चाकू आणि चेहऱ्यावर मास्क होता. मग मला काहीतरी झालं आणि मी जाऊन त्याला सरळ पकडलं. मी धावत जाऊन त्याला खाली पाडले, मग आमच्यात हाणामारी झाली. तो माझ्यावर शक्य तितक्या जोरात वार करत होता, मग जोराचा आवाज आला आणि… शॉक आणि अ‍ॅड्रेनालाईनमुळे मला जास्त वेदना जाणवल्या नाहीत. मग तो माझ्या मानेवर मारत राहिला आणि मी माझ्या हाताने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या तळहातावर, मनगटावर आणि हातावर चाकूच्या जखमा झाल्या आहेत. जोरदार हाणामारी झाली. तो दोन्ही हातांनी वार करत होता’, असे सैफ म्हणाला. सैफ अली खानने सांगितले की, काही वेळानंतर तो शरीफुलला रोखू शकला नाही. कारण एकाच वेळी त्याच्या हातात दोन चाकू होते आणि तो कुर्ता-पायजमा घालून अनवाणी पायाने होता. या माणसाला कोणीतरी माझ्यापासून दूर करेल, एवढीच प्रार्थना मी त्यावेळी करत होतो.

त्यानंतर या संपूर्ण घटनेवर सैफ म्हणाला की, ‘माझ्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार आहे. माझ्या घराचं दार मीच नीट बंद केलं नव्हतं. मी सोसायटी, पोलिस कोणालाच दोष देणार नाही. माझ्या बाबतीत असं घडेल याची कल्पना मला नव्हती. पण तैमुर म्हटला, चोर भूकेला असेल त्याला माफ करा, त्यामुळे मी चोराला माफ केलं आहे.’ दरम्यान, सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘ज्वेल थीफ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये त्याच्या हातावर प्लास्टर आणि मानेवर पट्टी बांधलेली आहे. ‘

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -