रायपूर : छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी छत्तीसडमध्ये ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार केले. सुरक्षा पथकांच्या या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत.
Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!
रविवारी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि बस्तर फायटर या तीन दलांनी संयुक्त कारवाई करुन एका चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ही २०२५ मधील आतापर्यंतची सुरक्षा पथकांची नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.
छत्तीसगडमध्ये बस्तर हा नक्षलवाद्यांचा मुख्य तळ समजला जातो. सुरक्षा पथके हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील काही दिवसांत मिळालेल्या यशामुळे सुरक्षा पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत २६८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच ७५० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांनी छत्तीसगडमध्ये एक हजारांपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांनी २०२५ हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३०० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा पथकांनी २१ जानेवारी २०२५ रोजी गरियाबंद जिल्ह्यात १८ नक्षलवाद्यांना ठार केले. आधी हीच सुरक्षा पथकांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई होती. आता रविवार ९ फेब्रुवारी रोजी केलेली कारवाई ही सुरक्षा पथकांची नक्षलवद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे.