Tuesday, March 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRahul Solapurkar : 'आंबेडकर ब्राम्हण, त्यांना दत्तक घेतलेलं' सोलापूरकरचे पुन्हा वादग्रस्त विधान...

Rahul Solapurkar : ‘आंबेडकर ब्राम्हण, त्यांना दत्तक घेतलेलं’ सोलापूरकरचे पुन्हा वादग्रस्त विधान चर्चेत!

मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेते राहुल सोलापूरकरने (Rahul Solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे शिवप्रेमी, राजकीय नेते यांसह संपूर्ण राज्यभरात असंतोष निर्माण झाला होता. शिवरायांबाबत केलेल्या विधानामुळे राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकरचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Rahul Solapurkar : ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचा खळबळजनक दावा!

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राहुल सोलापूरकरने आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले आहे. वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात, असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकरने एका मुलाखतीमधून केले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाली आहे.

काय म्हणाला सोलापूरकर?

‘रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव, जो एक आंबेडकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्याने प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसे म्हटले आहे. सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण: म्हणजे अभ्यास करुन तो मोठा झालेला आहे. तसे त्या अर्थाने वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात’, असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकरने केले आहे.

आंबेडकरी संघटना आक्रमक

सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे सोलापूरकरने आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Actor Rahul Solapurkar : शिवाजी महाराजांविषयी बोलणाऱ्या राहुल सोलापूरकरचा यूटर्न; जाहीर माफीनामा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -