कधी होणार भारत - इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ? कसा आणि कधी बघता येणार ?

कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी २० सामन्यांची मालिका भारताने ४ - १ अशी जिंकली. यानंतर सुरू झालेल्या भारत - इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने चार गडी राखून जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामना रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून कटक येथे सुरू होणार आहे. कटकच्या बाराबती स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर आणि थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर होणार आहे.



मालिकेत भारताने १ - ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे कटकमध्ये जिंकून टीम इंडियाला मालिका २ - ० अशी जिंकण्याची संधी आहे.



कटकच्या सामन्यासाठी अंतिम संघ या खेळाडूंमधून निवडणार

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्टीरक्षक) , यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , हर्षित राणा , कुलदीप यादव , मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती , वॉशिंगटन सुंदर , विराट कोहली , रिषभ पंत, अर्शदीप सिंग

इंग्लंड : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक) , जोस बटलर (कर्णधार) , बेन डकेट , जो रूट , हॅरी ब्रूक , जेकब बेथेल , लियाम लिव्हिंगस्टोन , ब्रायडन कार्स , आदिल रशीद , जोफ्रा आर्चर , साकिब महमूद , गस अ‍ॅटकिन्सन , मार्क वूड , जेमी ओव्हरटन , जेमी स्मिथ



भारत विरुद्ध इंग्लंड, एकदिवसीय सामन्यांची मालिका, सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू

  1. पहिला सामना - भारताचा चार गडी राखून विजय

  2. दुसरा सामना - बाराबती स्टेडियम, कटक

  3. तिसरा सामना - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट