मुंबई : बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या सोनी टिव्ही वरील क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती १६’ होस्ट करत आहेत. या कामात व्यस्त असताना देखील अमिताभ बच्चन रोजचा ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनातील भावना नक्की शेअर करत असतात. अशातच अमिताभ बच्चन यांनी पूर्वीचे एक्स अकाउंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे चाहते चिंतेत आले आहेत.
Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
काल ७ फेब्रुवारीच्या रात्री एक ट्विट केले ज्यामुळे त्यांचे चाहते अस्वस्थ झाले. अमिताभ यांनी रात्री ८:३० वाजता एक गूढ पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये “जाण्याची वेळ आली आहे…” असे त्यांनी लिहिले आहे. ही पोस्ट पाहून अमिताभ बच्चन यांचे चाहतावर्ग घाबरला आहे. या ट्विटवर चाहत्यांनी त्यांना सर्वकाही ठिक आहे ना?, काय झालंय सर?, असे म्हणून नका सर अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटवर कोणते स्पष्टीकरण दिले नाही.
T 5281 – time to go ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 7, 2025