वाढवण महामार्ग ३४८६ कोटींचा

  117

डहाणू : पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ आशिया खंडातले सर्वात मोठे वाढवण बंदर उभारण्याचे काम सुरू आहे. या बंदराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचीही योजना तयार आहे. या महामार्गासाठी ३४८५.९९ कोटी रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन आहे. एकूण ३२.२८ किमी लांबीचा महामार्ग उभारला जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्ग उभारणीची तयारी सुरू केली आहे. यासाठी भूसंपादन लवकरच सुरू होणार आहे.





वाढवण बंदर उभे झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तेथे दररोज ५० हजार मालवाहक वाहनांची ये - जा होईल, असा अंदाज आहे. यासाठी एनएचएआय चार येण्याच्या आणि चार जाण्याच्या अशा आठ मार्गिका असलेला अर्थात आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार आहे.



हा महामार्ग वरोर येथून सुरू होऊन बावडा, सुमाडी, चिंचारे, नानीवली ते तवा असा असेल. यादरम्यान हा महामार्ग रेल्वेचा डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर, सध्याचा पश्चिम रेल्वेमार्ग, बांधकामाधीन बुलेट ट्रेन मार्ग, बांधकामाधीन बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग यांना पार करून राष्ट्रीय महामार्ग ४८ला तवा येथे जोडला जाईल. याला चिंचारे येथे बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गासाठी तर सुमाडी येथे बुलेट ट्रेनच्या बोईसर स्थानकासाठी इंटरचेंज अर्थात आंतरबदल असेल.

प्रस्तावीत महामार्गावर दोन बोगदे असतील. त्यातील एक बोगदा सुमाडी ते रावतेदरम्यान वनक्षेत्रादरम्यान असेल. दोन मोठे पूल, १९ लहान पूल, तीन उड्डाणपूल, सात अंडरपास, २० हलक्या वाहनांचे व १० लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग असतील.
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची