Pune News : पुण्यातील रस्त्यांवर अवजड वाहनांना नो एन्ट्री!

  69

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या समस्येवर वाहतूक पोलीस वेळोवळी उपाययोजना करत असतात. वाहतूक शाखा, महापालिका आणि संबंधित विभागाकडून एकात्मिक प्रयत्न करून निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. अशातच प्रशासनाने आता पुण्यातील रस्त्यांवर अवजड वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Pune News)



वाहतूक शाखेने मुंबई-बंगळुरू महामार्ग वगळता पुणे शहरात येणाऱ्या जड वाहनांवर प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सहा ते दहाचाकी वाहने, मालवाहू अवजड वाहनांना मध्यरात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत निश्चित केलेल्या मार्गांचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी शहरात काही रेडझोन मार्ग तयार केले असून या मार्गावर वाहतूक शाखेच्या पूर्वपरवानगीनेच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संबंधितांना वाहतूक शाखेकडे अर्ज करावा लागणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.



अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग


अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांना रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. अवजड वाहनांनी नगर रस्ता, खराडी बाह्यवळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, येरवड्यातील गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, चंद्रमा चौक , होळकर पूल, खडकीमार्गे इच्छितस्थळी जावे. खराडी बाह्यवळण मार्ग, मुंढवा चौक, मगरपट्टा, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक, मार्केटयार्डमार्गे इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने येणाऱ्या अवजड वाहनांनी हडपसर, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. हडपसरकडून मंतरवाडी, सासवड रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन झेंडे यांनी केले आहे. (Pune News)

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा