मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांसाठी भरती जारी केली आहे. (ESIC Recruitment) यासाठी उमेदवारांना esic.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारावा लागणार आहे. आजपासून अर्ज प्रकिया सुरु झाली असून १७ फेब्रुवारी अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Navpancham Rajyog : मंगळ-शनीचा होणार नवपंचम राजयोग! ‘या’ राशींचं उजळणार भाग्य; मिळणार बक्कळ पैसा
ईएसआयसीने २०० रिक्त पदांवर भरती जारी केली आहे. यामध्ये मेडिकल विभागात स्पेशलिस्ट, सिनियर रेजिडेंट, सुपर स्पेशलिस्ट, टिचिंग फॅकल्टी, विजिटिंग फॅकल्टी पदासाठी भरती जारी केली आहे. स्पेशलिस्ट पदासाठी ४ जागा रिक्त आहे. पॅनलमेंट, सुपर स्पेशलिस्ट पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. टिचिंग फॅकल्टीमध्ये ९ जागा रिक्त आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी २१ जागा रिक्त आहे. सहायक प्रोफेसर पदासाठी ३१ जागा रिक्त आहेत. सिनियर रेजिडेंट पदासाठी १२१ रिक्त जागा आहेत.
दरम्यान, या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असणे गरजेचे आहे. उमेदवारांची योग्यता आणि मेडिकल फिल्डमधील अनुभव याद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग करुन मुलाखतीद्वारे त्यांची निवड केली जाणार आहे.