Saturday, March 15, 2025
Homeदेश'आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल'

‘आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल’

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले तर आम आदमी पार्टीचा पराभव झाला. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत वर्तवले आहे.

‘सत्ता आणि पैशाची मस्ती केजरीवालांच्या डोक्यात गेली’

भारतीय जनता पार्टीने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची निवडणूक जिंकली. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एकाधिकारशाहीबाबत बोलले. सत्ता होती म्हणून अनेकांनी केजरीवाल यांची एकाधिकारशाही खपवून घेतली. आता केजरीवाल यांच्यावर टीका करण्यास आणि त्यांचे दोष जाहीर करण्यास सुरुवात होईल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.

Delhi Chief Minister 2025 : दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण? ‘या’ सात नावांची जोरदार चर्चा

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४३ जागांवर भाजपाचा विजय झाला. तसेच भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर २१ जागांवर आपचा विजय झाला आणि ते एका जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिरवणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकणे जमलेले नाही. काँग्रेसने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत शून्य जागा जिंकण्याची हॅटट्रिक केली. तर आपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी सत्ता गमावली. माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आपचे संस्थापक सदस्य आणि प्रमुख नेते असलेले मनीष सिसोदिया या दोघांचा पराभव झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी या कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत जिंकल्या. या निकालावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, आम आदमी पार्टीने मागील १० वर्षे दिल्लीकरांची फसवणूक केली. आम आदमी पार्टीने अनेक आश्वासने पूर्ण केली नाही. वेगवेगळ्या योजना जाहीर करुन केजरीवाल आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे काम केले, असाही आरोप केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला.

आतिशी यांना भेटा आणि विचारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या कार्यकाळात निर्णय घेण्यासाठी किती स्वातंत्र्य होते ? या प्रश्नाच्या उत्तरातच केजरीवालांच्या एकाधिकारशाहीची माहिती मिळेल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. दिल्लीच्या निकालाचा परिणाम २०२७ मध्ये पंजाबच्या विधानसभा निवडणुकीवरही दिसू शकतो. भाजपाची पंजाबमधील कामगिरी सुधारू शकते, असेही भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वर्तविले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -