अहिल्यानगर : अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच त्यांचा पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांचा विश्वास गमावला. मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही. केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामे केली, मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला जोरदार धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक जणांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर हजारे माध्यमांशी बोलत होते.
Amit Shah : दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त केला
दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला, त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं, दारूचे मोठ्या प्रमाणात परवाने दिले गेले. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता त्यांना नाकारल्याचं दिसत आहे आज जो कौल आपल्याला पाहायला मिळतो आहे तो दारूच्या दुकानांना दिलेली लायसन्स आणि त्यातून मिळालेले पैसे याचा परिणाम असल्याचं हजारे यांनी म्हटलं आहे.