Water Shortage : अलिबागकरांवर पाणीटंचाई! ४७ गावांतील नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

अलिबाग : अलिबाग येथील उमटे धरणातून (Alibaug Umte Dam) मिळणाऱ्या पाण्यातून ४७ गावांतील लाखो नागरिकांची तहान भागवली जाते.  या धरणातील पाण्यावर तालुक्यातील गावे अवलंबून आहेत. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी डिसेंबर महिन्यापासून पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपात करण्यात येते. मात्र यंदा ही पाणीकपात फेब्रुवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा येईपर्यंत अलिबागकरांवर पाणीटंचाईचे (Water Shortage) सावट निर्माण झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरण बांधून ४७ वर्षे झाली असून, धरणातील गाळ काढला गेला नसल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागले आहे.


दरम्यान, गाळ काढण्याकडे राजिपचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शेकापच्या माध्यमातून आणि राजिपच्या परवानगीने या धरणातील काहीअंशी गाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने हे गाळ काढणे थांबले गेले. मात्र धरणात पाणी असल्याने गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. (Water Shortage)


उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, पावसाळा येईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक आहे. यासाठी १ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणात ५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील गाळ मार्च महिन्यापासून पाणी पातळी कमी झाल्यानंतर काढण्यास सुरुवात केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता निहाल चवरकर यांनी म्हटले.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास