Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक

मुंबई : मुंबईकरांना (Mumbai Local) रविवारी प्रवास करायचा झाल्यास त्या प्रवासाची पुरती वाट लागते. कारण रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) देखभाल आणि तांत्रिक बिघाडाबाबत दुरुस्ती कामे हाती घेतली जातात. दरम्यान या आठवड्यात फक्त रविवारच नाही तर शनिवारीही प्रवाशांचे हाल होणार आहेत. (Western Railway)



पश्चिम रेल्वेवर १३ तासांच्या जम्बो ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत ट्रॅक दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा अपडेट आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. शनिवार ८ फेब्रुवारी आणि रविवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे. यावेळी ग्रॅन्ट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे.


ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच काही ट्रेन्स या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच चर्चगेटपर्यंत धावणाऱ्या काही ट्रेन्स या वांद्रे ते दादरपर्यंत धावतील किंवा रद्द केल्या जातील.

Comments
Add Comment

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात