सिंधुदुर्ग : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जातात. मात्र सिंधुदुर्गवासीयांना जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्यामुळे जाता येत नाही. यासाठी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांना सावंतवाडी व कणकवली येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.
खासदार राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यासंदर्भात पत्र लिहून महाकुंभसाठी दिलेल्या गोवा ते प्रयागराज या रेल्वे सेवेबद्दल अभिनंदन केलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या रेल्वेला एक ही थांबा नसल्याने सिंधुदुर्गवासीयात नाराजी असल्याने जिल्हा वासियांना कुंभमेळ्यात जाण्यासाठी सावंतवाडी व कणकवली रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी केली आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…