उत्तुंग इमारतींसाठी अग्निशमन दल करणार सीएएफएस आणि ड्रोनचा वापर

  133

मुंबई(विशेष प्रतिनिधी) - मुंबईत मागील काही वर्षांपासून टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असून या उत्तुंग इमारतींचे बांधकाम होत असतानाच त्याठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात असक्षम ठरत आहे. मुंबईत मागील काही महिन्यांमध्ये या उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रकार अधिक होत आहेत. त्यामुळे या टोलेजंग इमारतींमध्ये आगीच्या घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस व ड्रोन सारख्या नवीन अग्निशमन यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५- २६च्या अर्थसंकल्पीय भाषणांत बोलतांना मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या यंत्रणांची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सध्या उत्तुंग इमारती बांधल्या जात आहे, त्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या घटना घडल्यास त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक इमारतींमध्ये यंत्रणा असली तरी बऱ्याच वेळेला त्या कार्यान्वित नसतात. त्यामुळे या उत्तुंग इमारतींमध्ये क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस चा वापर केल्यास ३०० ते ४०० मीटर उंचीपर्यंत अर्थांत १०० मजल्यापर्यंतच्या इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवता येवू शकते.



तसेच ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने मागील दोन ते तीन वर्षांपासून मुंबई अग्निशमन दलात ड्रोनचा वापर करण्याची सूचना केली जात आहे. परंतु ६७ मीटर पेक्षा अधिक उंचीपर्यंत या ड्रोनचा वापर होवू शकत नाही. त्यामुळे या ड्रोनचा वापर अधिक उंचीच्या इमारतींसाठी कसा होवू शकतो याची चाचपणी केली जात असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले