बेस्ट उपक्रमाला महापालिकेचा हातभार, महापालिका देणार १००० कोटी रुपयांचे अनुदान

  245

मुंबई(विशेष प्रतिनिधी) - आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिका किती आर्थिक मदत करते यावर सर्वाचे लक्ष लागून होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाकरता महापालिका १००० कोटी रुपयांचा अनुदान देणार असून त्यासाठीच्या निधीची तरतूद आगामी अर्थंसकल्पात केली आहे. याशिवाय इलेक्ट्रीक बसेस खरेदीकरता २५० कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.


सन २०१२-१३ पासून जानेवारी २०२५ पर्यंत मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास एकूण ११३०४.५९ कोटी एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. सध्याचे हाती घेतलेले प्रकल्प आणि इतर महत्वाच्या उद्दिष्टांकरिता स्वतः मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असतानाही, बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १००० कोटी इतकी तरतूद अनुदान म्हणून प्रस्ताविण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


ही रक्कम बेस्ट उपक्रमास पायाभूत सुविधांचा विकास आणि भांडवली उपकरणांची खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्वावरील नवीन बसेस, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च, आयटीएमएस प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी, विद्युत देणी, इत्यादी तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या २,००० इलेक्ट्रीक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यासाठीच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेचा ५% हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी या खर्चापोटी प्रदान करण्यात येणार आहे.


त्याचप्रमाणे, विद्युत बसगाड्या खरेदी करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाकडून १९९२ कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी, प्राप्त झालेली १४९३.३८ कोटी इतकी रक्कम बेस्ट उपक्रमास अधिदानीत करण्यात आली आहे व उर्वरीत ४९८.६२ कोटी इतकी रक्कम १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर बेस्ट उपक्रमास उपलब्ध करुन देण्यात येईल. यातील २५० कोटी रुपये देण्यात आल्याने उर्वरीत २५० कोटी रुपयांची रक्कम ही बेस्टला बसेस खरेदीकरताच वापरता येईल, आणि १००० कोटी रुपयांचे अनुदानाचे बेस्टने काय करावे हे त्यांनी ठरावावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले/

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई