नाशिक : शेजारच्यांनी घराजवळ कुत्री पाळल्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायलेकांनी एका कुटुंबास मारहाण करीत तोडफोड केल्याची घटना सामनगाव रोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती मारुती साठे व आरोपी वंश दिलीप सोनवणे व साधनाबाई दिलीप सोनवणे हे नवीन सामनगाव रोडवरील एकलहरा येथील सिद्धार्थनगरमध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी साठे यांनी घराजवळ कुत्री पाळली आहे.
या कुत्रीपासून आरोपी सोनवणे यांना त्रास होत आहे. यावरून आरोपी सोनवणे यांनी कुरापत काढून फिर्यादी साठे यांच्यासह त्यांचे पती व मुलांना शिवीगाळ केली, तसेच वंश सोनवणे याने फिर्यादीच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले, तर साधनाबाई सोनवणे यांनी साठे कुटुंबीयांना शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…