मध्यमवर्गीय, महिला, युवा, बळीराजा आणि उद्योजकांना अच्छे दिन; १२ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त

  125

नवी दिल्ली : मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेल्या घोषणांमुळे मध्यमवर्गीय, महिला, युवा, बळीराजा आणि उद्योजकांना अच्छे दिन येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

https://www.youtube.com/live/AUk6yYDxFZo?feature=shared



नव्या करप्रणालीनुसार केंद्र सरकारने ज्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना स्टँडर्ड डिडक्शन अर्थात थेट वजावट ही ७५ हजार रुपयांची असेल असे जाहीर केले आहे. तसेच हे उत्पन्न नव्या करप्रणालीनुसार करमुक्त असेल असेही जाहीर केले आहे. पगारदारांसाठी ज्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख ७५ हजार रुपयांपर्यंत आहे त्यांना थेट वजावट ७५ हजार रुपयांची असेल. तर जुन्या करप्रणालीनुसार चार लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. पुढील आठवड्यात आयकर रचनेबाबत एक विधेयक सभागृहात सादर केले जाईल; अशीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखांपर्यंत वाढवली आहे. घरभाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टीडीएस मर्यादा आता सहा लाख रुपये करण्यात आली आहे. या घोषणांमुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे.



जुनी करप्रणाली किती वार्षिक उत्पन्नावर किती रुपये कर ?

० ते ४ लाख रुपये - कर नाही
४ ते ८ लाख रुपये - ५ टक्के कर
८ ते १२ लाख रुपये - १० टक्के कर
१२ ते १६ लाख रुपये - १५ टक्के कर
१६ ते २० लाख रुपये - २० टक्के कर
२० ते २४ लाख रुपये - २५ टक्के कर
२४ लाख रुपयांपेक्षा जास्त - ३० टक्के कर



काय झाले स्वस्त ?

टीव्ही, मोबाईल, ३६ जीवरक्षक औषधे, इलेक्ट्रिक कार, मोबाईल, एलईडी, एलसीडी, चामड्याच्या वस्तू



बळीराजाला दिलासा देणाऱ्या घोषणा

पीएम कृषी धान्य योजना राबवणार, योजनेचा १.७० कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
डाळ, युरिया, डाळिंबांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होणार
कापूस उत्पादनाच पाच वर्षात वाढ करणार
मासे निर्यातीला चालना देणार, मच्छिमारांना दिलासा देणारे निर्णय घेणार
सात कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, शेतकऱ्यांची कर्ज मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवणार
बिहारमध्ये मखाण बोर्ड स्थापन करणार
डेअरी आणि मत्स्यपालनासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज देणार

महत्त्वाच्या घोषणा

पायाभूत सुविधांसाठी राज्यांना व्याजमुक्त निधी
दीड लाख कोटींची रक्कम ५० वर्षांसाठी व्याजमुक्त
प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचवणार
जलजीवन मिशन २०२८ पर्यंत सामान्यांचे पाणी प्रश्न सोडवणार
एक लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड उभारणार
सामान्यांसाठी घरांची योजना

पर्यटनाला चालना देणार

देशात ५० नवी पर्यटन स्थळे
होम स्टे उभारण्यासाठी आकर्षक कर्ज योजना
पर्यटक आणि वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्यांकरिता व्हिसाचे नियम सोपे करणार
भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार
धार्मिक पर्यटनाला चालना देणार
वैद्यकीय पर्यटनाला चालना देणार

अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठीच्या घोषणा

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्राँडब्रँड सेवा पुरवणार
जिल्हा रुग्णालयात डे केअर कॅन्सर केंद्र
पाच वर्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या ७५ हजार जागा वाढवणार
डिलिव्हरी बॉइजसाठी आरोग्य विमा
विमा क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी
३६ जीवरक्षक औषधांना करात सवलत
वैद्यकीय उपकरणांना करात सवलत

अर्थसंकल्पातील तरुणांसाठीच्या घोषणा

निर्यातीला चालना देणार
रोजगारासाठी दोन लाख कोटींची योजना
देशातील वीस लाख तरुणांना विशेष कौशल्यांचे प्रशिक्षण
देशातील ५०० बड्या कंपन्यांतून एक कोटी तरुणांना प्रशिक्षणाची संधी
प्रशिक्षणार्थींना पाच हजार रुपयांचा मासिक भत्ता
देशातील १०० शहरांमध्ये नवे इंडस्ट्रीअल पार्क उभारणार
मुद्रा कर्ज मर्यादा २० लाखांपर्यंत
MSME साठी SIDBI शाखा वाढवणार

Comments
Add Comment

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी