सलग दुसऱ्यांदा भारतीय मुलींचा संघ १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

क्वालालंपूर : भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंडने वीस षटकांत आठ बाद ११३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने पंधराव्या षटकातच उपांत्य सामना जिंकला. टीम इंडियाने नऊ गडी राखून इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. मोठा विजय मिळवत भारताने दिमाखात विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.



नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या पारुनिका सिसोदियाच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पुरती कोंडी झाली. भारताकडून पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्माने प्रत्येकी तीन तर आयुषी शुक्लाने दोन बळी घेतले. इंग्लंडकडून डेविना पेरिनने ४० चेंडूत ४५ आणि ए. नोरग्रोव्हने २५ चेंडूत ३० धावा केल्या. जी. कमलिनी (५६ धावा) आणि गोंगडी तृषा (३५ धावा) यांनी भारताचा विजय सोपा केला.



आता १९ वर्षांखालील मुलींच्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असतील. हा सामना जिंकून विश्वचषकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे. याआधी २०२३ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता.

Comments
Add Comment

T20 Series : झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान!

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ

Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी सदस्य डेव्हिड वॉर्नर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षाच्या

ICC Ranking : आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये मोठा ट्विस्ट! रोहित-विराटला होणार फायदा ?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Rohit Sharma - Ravi Shastri : 'रोहितने आपल्या खेळीतून टीकाकारांच्या गालावर चपराक लगावली!' – लॉर्ड्समधील शतकानंतर रवी शास्त्रींची रोखठोक प्रतिक्रिया

मुंबई : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळलेल्या १३८ धावांच्या शानदार शतकी खेळीनंतर भारतीय

Kuldeep Yadav : भारतीय संघाच स्थान नाही, शेवटी कुलदीपने घेतला मोठा निर्णय; आता 'या' देशासाठी खेळणार...

मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) यॉर्कशायर काउंटी क्लबसोबत करार केला. तो या हंगामात संघासाठी आठ

Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी

वृंदावन : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर प्रेमानंद