Monday, February 10, 2025
Homeमहत्वाची बातमीडॉलरकडे दुर्लक्ष करण्याचा खेळ चालणार नाही...भारत-चीनसह ब्रिक्स देशांना ट्रम्प यांची धमकी

डॉलरकडे दुर्लक्ष करण्याचा खेळ चालणार नाही…भारत-चीनसह ब्रिक्स देशांना ट्रम्प यांची धमकी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना खुली धमकी दिली आहे. गेल्या काही काळापासून अशी बातमी येत होती की ब्रिक्स देश आपली करन्सी सुरू करू शकतात. मात्र ट्रम्प यांनी याबाबतीत ब्रिक्स देशांना खुली धमकी दिली आहे.

ट्रम्प यांनी म्हटले की ब्रिक्स देशांनी हे समजून घेतले पाहिजे की ते अमेरिकन डॉलरला रिप्लेस करू शकत नाही. जर असे घडले तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लादला जाईल.

 

ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर पोस्टमध्ये म्हटले, ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे चालणार नाही. या हॉटस्टाईल देशांनी अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हाना देण्यासाठी ब्रिक्स करन्सी बनवू नये तसेच इतर करन्सींना पाठिंबा देऊ नये असे आम्हाला वाटते. जर असे केले नाही तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लादला जाईल.

ट्रम्प म्हणाले की जर असे झाले नाही तर या देशांसाठी अमेरिकन बाजाराचे दरवाजे बंद होतील. त्यांना इतर बाजार शोधावे लागतील.

ब्रिक्स देशांना का हवीये करन्सी?

ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकासारखे सामील आहेत. यांना जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलवरील अवलंबता कमी करायची आहे. ब्रिक्स देश आपला व्यापार ब्रिक्स करन्सीच्या मदतीने सुरू करण्याचा विचार करत आहेत. रशिया आणि चीन आधीपासूनच डॉलरच्या ऐवजी युआन आणि इतर करन्सीच्या मदतीने व्यापार करत आहे. आता ब्रिक्स नव्या करन्सीसह अमेरिकेची आर्थिक स्थिती कमकुवत बनवू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -