Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीDelhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

Delhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi Assembly Election) सात आमदारांनी एकाच दिवशी पक्षाची प्राथमिक सदस्यता सोडल्याने आम आदमी पार्टी (आप)ला मोठा धक्का बसला आहे. या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौड़, महरौलीचे आमदार नरेश यादव यांचा समावेश आहे. या निर्णयाने ‘आप’च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mumbai Water Cut : मुंबईत ३० तासांचा पाणीब्लॉग! शहर आणि उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये नसणार पाणी

या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीने ज्या ईमानदारीच्या विचारधारेवर आधारित असलेल्या सत्तेसाठी काम केले होते, त्या विचारधारेपासून पार्टी सध्या किती दूर गेली आहे, हे या सात आमदारांच्या सोडण्याच्या निर्णयातून स्पष्ट होईल. पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वर्तुळात या घटनाक्रमावर विविध चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांनी पार्टीच्या नेतृत्वावर टीका केली आहे, तर काहींनी या निर्णयाला ‘आप’च्या अंतर्गत फुटीचे कारण ठरवले आहे.

पक्ष सोडलेल्या आमदारांमध्ये महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी ईमानदारीच्या राजकारणासाठी जॉइन केली होती, पण आता पक्षात इमानदारीचे काहीच दिसत नाही. महरौलीच्या जनतेने मला सांगितले की हा पक्ष सोडायला हवा, कारण त्यांनी आमच्याशी फसवणूक केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -