Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Water Cut : मुंबईत ३० तासांचा पाणीब्लॉग! शहर आणि उपनगरांतील 'या'...

Mumbai Water Cut : मुंबईत ३० तासांचा पाणीब्लॉग! शहर आणि उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये नसणार पाणी

मुंबई : पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान मुंबई महानगरपालिकेमार्फत (Municipal Corporation) नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते गुरुवारी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण ३० तास ही जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम सुरू राहणार आहे. (Mumbai Water Cut)

Economic Survey : शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती

या कालावधीत मुंबईतील भांडुप विक्रोळी( एस), कुर्ला( एल), विलेपाले ते अंधेरी पूर्व बाजु(के पूर्व) , वांद्रे ते सांताक्रुंझ पूर्व (एच पूर्व), आणि माहिम दादर धारावी (जी उत्तर) विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी, पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्या विभागातील राहणार पाणीपुरवठा बंद?

  • महापालिका एस विभाग : श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेतपाडा, मिलिंद नगर. नरदास नगर, शिवाजी नगर, मरोडा हिल, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उदंचन केंद्र, मोरारजी नगर. सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी. तुळशेतपाडा, टेंभीपाडा, नरदास नगर, रमाबाई नगर १ आणि २, साई हिल भांडुप जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका एस विभाग : क्वारी मार्ग, प्रताप नगर मार्ग, जंगल मंगल मार्ग, टेंभीपाडा, गावदेवी मार्ग, दत्त मंदीर मार्ग, लेक मार्ग, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंतचा लालबहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदान जवळील परिसर, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, रामनगर उदंचन केंद्र, रावते कंपाऊंड उदंचन केंद्र, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, (नवीन हनुमान नगर) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका एल विभाग : कुर्ला दक्षिण – काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, हलावपूल, न्यू मील मार्ग, कपाडिया नगर, नवीन म्हाडा वसाहत, परिघखाडी, तकिया वॉर्ड, महाराष्ट्र काटा, गफुर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग (पूर्व व पश्चिम), क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका एल विभाग : कुर्ला उत्तर – ९० फीट रोड, कुर्ला – अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर – अंधेरी जोडरस्ता, साकीविहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्यनगर पाईपलाईन (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका जी उत्तर विभाग : धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मीन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका जी उत्तर विभाग : जस्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फीट मार्ग, ९० फीट मार्ग, संत कक्कया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका के पूर्व विभाग : विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका के पूर्व विभाग : ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र) सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका के पूर्व विभाग : आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ- मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी., मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका के पूर्व विभाग : चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर रोड, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका के पूर्व विभाग : कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. ऍन्ड. टी. वसाहत (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)
  • महापालिका एच पूर्व विभाग : ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर (वांद्रे पूर्व) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -