मुंबई : मुंबई पुष्पोत्सवाची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यापार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही भायखळा येथील जिजामाता उद्यानात ‘मुंबई पुष्पोत्सव’ (Mumbai Flower Festival) सुरु करण्यात आला आहे. भारताची राष्ट्रीय प्रतिके फुलांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे हा यंदाचा ‘मुंबई पुष्पोत्सव’ अर्थातच वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामागची संकल्पना आहे. यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी-सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला, मसाल्यांची रोपे मांडण्यात आली आहेत. अत्यंत कष्टाने आणि प्रतिभेने हे प्रदर्शन सजविले आहे. मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.
पालिका, वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे मुंबई पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. पालिकायुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते नुकतेच पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, फुलांना पाहून कोणलाही उल्हासित वाटते. या पुष्पोत्सवातून हा हेतू साध्य होणार आहे. याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक संपदेचे जतन कसे करावे, त्याची कशी काळजी घ्यावी, त्याबाबत कोणती माहिती आपल्याकडे हवी, यासाठी देखील हे प्रदर्शन मुंबईकरांसह पर्यटकांना उपयोगी ठरणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱया या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शनिवारी, रविवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत पुष्पोत्सव सगळ्यांसाठी खुले राहाणार आहे. मुंबई पुष्पोत्सवाच्या यंदाच्या संकल्पनेत भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतिकांचे दर्शन घडविण्यात आले. झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी साकारलेला तिरंगा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय. भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती लाकडी कलाकृतीच्या माध्यमातून साकारली आहे. राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याची रचना झेंडूच्या फुलांनी तयार केली. राष्ट्रीय जलचर असलेले गंगा डॉल्फिन पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी साकारले आहे. यासह कमळ, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय वृक्ष वड, अशोक स्तंभ, गंगा नदी, मोर आदी प्रतिकेही मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. बागेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे, खतांचेही प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. तसेच निवडुंग प्रजातींचे प्रदर्शनही आहे. तसेच वेगवेगळ्या बोन्साय प्रजातींची आकर्षक मांडणी, औषधी वनस्पती, क्रेप पेपरच्या फुलांचे प्रदर्शन आणि सेल्फी पॉइंटही साकारण्यात आला आहे. पुष्पोत्सवात देशी-विदेशी रोपांची विक्रीसाठी दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच कृषी साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे आणि शेतीसंबंधित साधनांचेही खरेदी-विक्रीची ५० हून अधिक दालने आहेत.
या उत्सवात मुंबई आणि उपनगरांतील शाळांच्या सहली देखील भेट देतात. पर्यावरणाचे अभ्यासक, छायाचित्रकारही या प्रदर्शनासाठी उत्सूक असतात. आज उद्घाटनाच्या दिवशीच हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. अनेकांनी राष्ट्रीय प्रतिकांच्या संकल्पनेचे कौतुक केले, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. (Mumbai Flower Festival)
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…