Friday, February 14, 2025
Homeदेशकिन्नर आखाड्यात वाद : ममता कुलकर्णीसह महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची...

किन्नर आखाड्यात वाद : ममता कुलकर्णीसह महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी!

प्रयागराज : बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) हिला किन्नर आखाड्यात प्रवेश दिल्याने प्रयागराज महाकुंभात किन्नर आखाड्यात फूट (Controversy) पडली आहे. यामुळे किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी आणि आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Lakshmi Narayan Tripathi) यांची हकालपट्टी केली आहे.

ममता कुलकर्णीला केवळ सात दिवसांत महामंडलेश्वर आखाड्यातून काढण्यात आले. ममताच्या पार्श्वभूमीवरून ट्रान्सजेंडर समाजात मतभेद निर्माण झाले होते. किन्नर आखाड्याने याबाबत निवेदन जारी करून स्पष्ट केले की, ममता कुलकर्णी संन्यासी नव्हत्या, त्यांनी मुंडन समारंभ केला नव्हता आणि आखाड्याच्या नियमांचे पालन देखिल केले नव्हते.

याशिवाय, त्यांच्या पूर्वीच्या चित्रपटसृष्टीतील बोल्ड प्रतिमेवर आणि अंडरवर्ल्डशी कथित संबंधांवरही आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आखाड्यातील मोठा गट अस्वस्थ झाला होता. या पार्श्वभूमीवर, आखाड्याने कठोर निर्णय घेत ममता कुलकर्णी आणि त्यांना महामंडलेश्वर पद देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

७ दिवसांपूर्वीच ममता कुलकर्णीने संन्यासाची दीक्षा घेतली आणि किन्नर आखाड्यात सामील झाली. महाकुंभात तिला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. यामुळे किन्नर आखाड्यात तिने प्रवेश केल्यापासून तिथे गोंधळ उडाला होता. ममता कुलकर्णीबद्दल ट्रान्सजेंडर क्षेत्रात मतभेद होते. पण आता हा गोंधळ संपला आहे. किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी हिच्या कारवाईवर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात ममता कुलकर्णी यांच्यावर कारवाईची कारणे देण्यात आली आहेत.

संसदेचे अधिवेशन आणि विदेशी शक्तींवर काय म्हणाले मोदी ?

किन्नर आखाड्याची पहिली समस्या म्हणजे ममता कुलकर्णी यांना थेट महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. ममता कुलकर्णी यांनी प्रथम त्यागाच्या दिशेने पुढे जायला हवे होते. त्यांनी संन्यासी व्हायला हवे होते. मग जर त्यांना महामंडलेश्वर ही पदवी दिली असती तर कदाचित काहीच अडचण आली नसती. किन्नर आखाड्याने जारी केलेल्या निवेदनातच याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ममता कुलकर्णी ही चित्रपट जगतातील आहे. चित्रपट जगतातील असणे हे मोठे कारण नव्हते. चित्रपटांमधील तिचा बोल्ड अवतार हेच खरे कारण आहे. तिने ९० च्या दशकात एक जबरदस्त फोटोशूट केले होते. किन्नर आखाड्यातील अनेक लोकांना यावरच आक्षेप होता.

ममता कुलकर्णीचे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले. ममताने चित्रपटसृष्टी सोडली आणि दुबईमध्ये ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीशी लग्न केल्याचे आरोप आहेत. एके ठिकाणी तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले. त्याच्यावर देशद्रोहाचे आणि अंडरवर्ल्डशी संबंधांचे देखील आरोप लादले आहेत.

आखाड्यांचा नियम असा आहे की जो व्यक्ती महामंडलमेश्वर बनतो तो संन्यासी असावा आणि त्याचे मुंडण करावे. मुंडन समारंभाशिवाय संन्यास वैध नाही. ममता कुलकर्णी संन्यासी नव्हत्या आणि त्यांनी ‘मुंडन’ समारंभही केले नाही आहे.

किन्नर आखाड्याच्या नियमांनुसार, आखाड्यातील भिक्षूंना त्यांच्या गळ्यात वैजयंतीची माळ घालावी लागते. पण ममता कुलकर्णीने रुद्राक्षाची माळ घातली होती. ममता कुलकर्णी यांचे महामंडलेश्वर हे पदवी किन्नर आखाड्याच्या नियमांनुसार नव्हते. त्यामुळे त्यांचे पद ७ दिवसातच काढून टाकण्यात आले आहे.

या सर्व गोष्टींमुळे आखाड्यातील सदस्यांमध्ये फूट पडली आहे. ममता कुलकर्णीच्या पार्श्वभूमीमुळे किन्नर आखाड्यातील एक मोठा वर्ग अस्वस्थ वाटत होता. म्हणूनच आज किन्नर आखाड्याच्या संस्थापकांनी ममता कुलकर्णी तसेच आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना बाहेरचा रस्ता दाखवला. २०१५-१६ च्या उज्जैन कुंभमेळ्यात आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी महामंडलेश्वर बनले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -