Friday, February 7, 2025
Homeदेशसंसदेचे अधिवेशन आणि विदेशी शक्तींवर काय म्हणाले मोदी ?

संसदेचे अधिवेशन आणि विदेशी शक्तींवर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी शक्तींबाबत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणता, सोनं एवढं महागलं !

देशात २०१४ पासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाआधी विदेशी शक्तींकडून मिळालेला मुद्दा घेऊन विरोधक सरकार विरोधात बोलायचे. पण यावेळी हा प्रकार घडलेला नाही. विदेशी शक्तींकडून विरोधकांना मुद्दा मिळालेला नाही. विरोधकांनीही कोणताही मुद्दा घेऊन सरकार विरोधात बोलायला सुरुवात केलेली नाही. यावेळी हे पहिल्यांदाच घडले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य करुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोमणा मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय ? कधी सादर होणार हा अहवाल ?

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान मोदींनी एक संस्कृत श्लोक म्हणून दाखवला. भारतीयांवर कृपा होवो, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदींनी माता लक्ष्मीला केली.

Budget 2025 : यंदाचं बजेट मध्यमवर्गीयांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार ?

‘भारत प्रजासत्ताक झाला त्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान म्हणून मला सलग तिसऱ्यांदा जनतेने देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारताला २०२४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्यादृष्टीनेच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या नियोजनाची झलक दिसेल’, असे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले. देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल त्यावेळी एक विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी; देशातील सर्व नागरिकांपर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचावेत यासाठी केंद्र सरकार अविश्रांत मेहनत करत आहे. देशातील महिलांचे सबलीकरण करम्यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -