Indian fishermen : श्रीलंकेने केली ६ भारतीय मासेमारांची सुटका

चेन्नई : श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटका झालेले ६ भारतीय मासेमार आज, गुरुवारी चेन्नईत पोहोचले. विमानतळावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


अलीकडेच, श्रीलंकेच्या नौदलाने १३ मच्छिमारांना पकडले होते. या काळात त्यांच्यावर गोळीबारही झाला, ज्यामध्ये २ मासेमार गंभीर जखमी झाले. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनाही दिल्लीला बोलावण्यात आले. श्रीलंकेच्या नौदल प्रमुखांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले की बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचे सांगितले.



जाफना येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी जखमी मासेमारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली होती. आम्ही मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहोत. तसेच मच्छिमारांवर बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत 'स्वीकारार्ह नसल्याचे भारताना म्हंटले होते. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत भारतीय मासेमारी जहाजाने क्षेत्र सोडण्याच्या सूचनांचे पालन न केल्याच्या संशयावरून नौदलाने ते ताब्यात घेतले होते.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा