Jalgaon Crime News : दुर्दैवी घटना; १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव : जामनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बघण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय संकेत निवृत्ती पाटील (रा. हिवरखेडा रोड, जामनेर) याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संकेत हा आठवीच्या वर्गात शिकत असून तो जामनेर शहरात असलेल्या मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता.


जामनेर येथे सोनबर्डीच्या पायथ्याशी नगरपालिकेचा जलतरण तलाव आहे. तो बघण्यासाठी संकेत हा त्याच्या मित्रासोबत गेला होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडायला लागला. तो दिसेनासा झाल्यामुळे नागरिकांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. तर पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.



आरोग्यदूत जालमसिंग राजपूत व सोबत एक तरुण यांनी संकेतला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु काही वेळाने संकेतचा मृतदेह हाती लागला, अशी माहिती मिळाली. कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या जलतरण तलावमध्ये नुकतेच पाणी भरण्यात आले होते. जलतरण तलाव चालू करण्यासाठी हे प्रयत्न होते. परंतु त्या अगोदर ही दुर्दैवी घटना घडली.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई