मुंबई : मुंबईकरांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत असलेले ‘सिद्धिविनायक मंदिरात’ (Siddhivinayak Temple) दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक दर्शनासाठी विविध पेहराव करुन येतात. अशाच भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
Police Bharti 2025 : वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! राज्यात १० हजार पोलिसांची भरती
सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले असेल तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव पावित्र्य जपणारा असावा. समोरच्या लोकांना लाजवतील किंवा संकोच वाटेल अशा कपड्यांवर आणि तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सिद्धीविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली. (siddhivinayak temple)