Eknath Shinde : बिर्ला कॉलेज, खडकपाडापर्यंतच्या मेट्रोचे लवकरच टेंडर काढू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण : मेट्रो -५ चा विस्तार बिर्ला कॉलेज, खडकपाडापर्यंत करण्याबाबत लवकरच टेंडर काढू अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एमसीएचआय-क्रेडाई संस्थेच्या वतीने कल्याण येथे आयोजित १४ व्या प्रॉपर्टी एक्स्पो कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भविष्यातील विकास प्रकल्प, कल्याण डोंबिवलीतील विकास कामे, नागरी समस्या आदी प्रमूख मुद्द्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.


ठाणे शहरानंतर वेगाने विकसित होणारा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली क्षेत्राकडे पाहिले जाते. या क्षेत्रात गेल्या काही वर्षात वेगाने विकास झाला असून याठिकाणी उत्तमोत्तम रस्त्यांचे जाळे, प्रस्तावित मेट्रो मार्ग यामुळे इथे घरे घेण्यासाठी ग्राहक पसंती देत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असून कल्याण- डोंबिवलीच्या १४० एमएलडी पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावू, सुर्या धरण जवळपास पूर्ण झाले आहे, देहरती धरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, काळू धरणासाठी वनविभागाला जागेचे ३५० कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



तर महायुती सरकारने विकासकांच्या प्रश्नांना कायमच प्राधान्य दिले आहे. आता नगरविकास आणि गृहनिर्माण दोन्ही खाती आपल्याकडेच असल्याने उरलेले प्रश्नही नक्की मार्गी लावू फक्त शहरातील क्लस्टर योजनेसाठी देखील विकासकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना केले. याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर, एमसीएचआई क्रेडाई संस्थेचे कल्याण डोंबिवली विभागाचे अध्यक्ष राजेश गुप्ता, सचिव सुनिल चव्हाण, माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आदींसह प्रदर्शनात सहभागी झालेले सर्व विकासक उपस्थित होते.

Comments
Add Comment

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख

तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी