Dombivli News : डोंबिवलीत हळदी कुंकूच्या कार्यक्रमावरून मराठी विरुद्ध अमराठी भाषिक वाद शिगेला

  140

डोंबिवली : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई , ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले.काल पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद शिगेला पोचला. डोंबिवली नांदीवली मधील एका सोसायटीत सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला तसेच अमराठी महिलांनी मराठी महिलांना अपशब्द वापरले असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.



डोंबिवलीतील पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या मराठी विरुद्ध इमारतीमध्ये अमराठी वाद उफाळून आला आहे. या इमारतीमध्ये येत्या २ फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे.


याबाबत मराठी कुटुंबाने आरोप केलाय की," अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले". याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळतेय.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली