पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत

पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. अमिताभ ⁠गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी एसीबीकडून पूर्ण झाली आहे.


⁠गुप्त चौकशीनंतर त्यांच्या उघड चौकशीची परवानगी एसीबीच्या महासंचालकांकडे मागण्यात आली आहे. ⁠गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे.⁠ गुप्ता यांच्या विरोधात माहिती आधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी तक्रार दाखल केली होती.


अमिताभ ⁠गुप्ता हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे वरीष्ठ आयपीएस आधिकारी होते. अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्याची एसीबीकडून चौकशी होण्याची पहिलीच वेळ आहे. ⁠गुप्ता यांचा पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमधील स्वीट वॅाटर विला प्रकल्पात अालिशान विला. विलाची किंमत २५ कोटी असल्याचा आल्हाट यांचा दावा आहे. ⁠मुंबईतील सांताक्रुझ येथे अमिताभ गुप्ता यांचा अालिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत २२ कोटी रुपये असल्याचे आल्हाट याचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील