मुंबई : एकीकडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटाचं सत्र सुरु आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता बॉलीवूडची ड्रामा क्वीन ओळख असलेली राखी सावंत सुद्धा लवकरच तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत चर्चेत असते. राखीने तिच्या अलिकडच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या चांगल्या लग्नाच्या मागण्यांबद्दलही सांगितलंय. पण यावेळेस तिला लग्न भारतात करायचं नसून पाकिस्तानात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Budget 2025 : निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प!
एका माध्यमाशी बोलताना राखी म्हणाली, “मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडप्यांनी लग्न केलं आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये स्थायिक झाले असून चांगलं जीवन जगत आहेत. या प्रकारच्या विवाहामुळे दोन्ही देशांमधील शांतता आणि समजूतदारपणा वाढतो. मला पाकिस्तानकडून खूप प्रस्ताव येत आहेत. जेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की, माझ्या मागील दोन्ही लग्नांमध्ये माझा किती छळ झाला होता. भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाहीत. प्रियकर दोदी खानबद्दल बोलताना राखी म्हणाली की, तो एक अभिनेता आणि सोबतच एक पोलिस अधिकारी सुद्धा आहे. राखी म्हणाली, ‘लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात होईल, हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ आणि दुबईत स्थायिक होऊ.”
राखीच्या या विधानानंतर तिचे चाहते खुश झाले आहेत. दरम्यान आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.