‘या’ लिंकवर पाहता येणार
नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सकाळी ११ वाजता आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. मागील चार केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पही पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.
कुठे थेट पाहता येईल अर्थसंकल्प?
- केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत, दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या अधिकृत वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल.
- सरकारच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही अर्थसंकल्प प्रसारित केला जाईल.
- सीतारामन यांचं केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चं भाषण Prahaar.in वरही पाहता येणार आहे.
- अर्थसंकल्प www.youtube.com/@PrahaarNewsline या यू ट्युब चॅलवरही बघता येईल.
बजेट २०२५ च्या लाइव्ह अपडेट्स आणखी कुठे मिळतील?
- अर्थसंकल्पाची कागदी प्रत डिजिटल स्वरूपात केंद्र सरकारच्या www.indiabudget.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध असेल.
- राज्यघटनेनं विहित केल्याप्रमाणे वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यतः अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाची मागणी (डीजी), वित्त विधेयक इत्यादींसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज ‘केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप’वर उपलब्ध असतील.
- अर्थसंकल्पाची कागदपत्रं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.