Friday, February 14, 2025
Homeक्रीडास्मृती मंधानाने पटकावला आयसीसी क्रिकेटपटू ऑफ द ईयर पुरस्कार

स्मृती मंधानाने पटकावला आयसीसी क्रिकेटपटू ऑफ द ईयर पुरस्कार

मुंबई : आयसीसीने सोमवारी (२७ जानेवीरी) वनडेतील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. यादरम्यान, भारतासाठीही आनंदाची बातमी मिळाली आहे.यामध्ये महिला संघात टीम इंडियाची स्मृती मानधना हिला पुरस्कार मिळाला आहे.तर पुरुष संघात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही आयसीसी पुरस्कार २०२४ मध्ये आपला ठसा उमटवला आहे.

भारताची स्टार क्रिकेटपटू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू २०२४ पुरस्कार मिळाला आहे. स्मृतीसह या पुरस्कारासाठी श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू, ऑस्ट्रेलियाची ऍनाबेल सदरलँड, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्डरवार्ट या खेळाडूंनाही नामांकन मिळाले होते. पण त्यांना मागे टाकत मानधनाने हा पुरस्कार पटकावला आहे. मानधना आयसीसीच्या महिला वनडे संघ २०२४ मध्येही स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. तिला आणि भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिचा आयीसीसीच्या सर्वोत्तम महिला वनडे संघ २०२४ मध्ये समावेश आहे.

स्मृतीने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध वनडे क्रिकेट खेळले आहे.तिने २०२४ वर्षात वनडेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत तीन सामन्यात ३४३ धावा केल्या होत्या, तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतक ठोकले. स्मृतीने २०२४ मध्ये १३ वनडे सामने खेळताना ४ शतके आणि ३ अर्धशतकांसह ५७.४६ च्या सरासरीने ७४७ धावा केल्या. तिने या वर्षात महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही आयसीसी पुरस्कार २०२४ मध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याला आयसीसीचा सर्वोत्तम टी२० पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्शदीपने या संपूर्ण वर्षात शानदार खेळ केला होता. त्याने २०२४ वर्षात १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १३.५ च्या सरासरीने ३६ विकेट्स घेतल्या होत्या.

आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू २०२४ पुरस्कार अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला ओमरझाई याला मिळाला आहे.त्याने हा पुरस्कार मिळवताना वनिंदू हसरंगा (श्रीलंका), कुशल मेंडिस (श्रीलंका) आणि शेर्फेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज) यांना मागे टाकले. या तिघांनाही या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले होते.त्याने २०२४ वर्षात ओमरझाईने १४ सामने खेळले. यामध्ये त्याने ४१७ धावा केल्या आणि १४ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या शानदार कामगिरीनंतर त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -