सोमवारी सोमप्रदोष शिवरात्री,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय

सोमवार २७ जानेवारी २०२५ रोजी पौषातील सोमप्रदोष शिवरात्री आहे. या दिवशी मनापासून निवडक उपाय केल्यास पितृदोषातून मुक्त होण्यास मदत होईल. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा शुभ योग जुळून आला आहे. सोमवारी प्रदोष आणि मासिक शिवरात्री ही भगवान शंकराला समर्पित असलेली व्रते एकाच वेळी येत आहेत. या दिवशी निवडक उपाय केल्यास वास्तूदोष, पितृदोष दूर होण्यास मदत होईल. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शंकराला अर्थात भगवान महादेव यांना समर्पित आहे. सोमप्रदोषाच्या दिवशी पांढरे पदार्थ (उदा : पांढरा भात, पांढऱ्या लाह्या, तांदुळ पीठ वापरुन तयार केलेली भाकरी, मुळ्याची भाजी किंवा कच्चा मुळा, काकडीची कोशिंबीर किंवा कच्ची काकडी, पांढरी बटाट्याची भाजी, पनीरपासून तयार केलेले पदार्थ, इडली, डोसा, खोबऱ्याची चटणी, कढी, दही, ताक, रव्याची खीर, शेवयांची खीर) खावे. शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. गरजूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. चंद्र देवाचे नामस्मरण करावे. यामुळे कुंडलीतील चंद्र मजबूत होण्यास मदत होते. प्रदोष आणि मासिक शिवरात्री ही एकाच दिवशी असल्यामुळे भगवान शिव अर्थात भगवान शंकर यांची मनापासून पूजा करावी. शिवपूजनाने कामातील अडथळे दूर होण्यास तसेच प्रगती होण्यास मदत होते.



भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले, बेलाची पाने (बिल्व पत्र किंवा बिल्व दल) अर्पण करावी. रुद्राभिषेक करावा. ॐ नमः शिवाय हा जप करावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात शिव परिवाराचे चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा करावी. घराच्या पूर्वेकडील अथवा वायव्येकडील भागात बेलाचे रोप लावावे. दररोज सकाळ - संध्याकाळ या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होईल.



घरात कलह किंवा इतर गंभीर समस्या असल्यास त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करावा. लघुरुद्र किंवा महारुद्र करावे. हे उपाय मनापासून करण्याने लाभ होतो.



ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा म्हणून ओळखली जाते. यामुळे रुद्राभिषेक याच दिशेला करावा. घराच्या ईशान्येस चंदनाचे खोड ठेवावे.



घरात शुद्ध पाऱ्यापासून तयार केलेले पारद शिवलिंग ठेवावे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने नियमित पूजा करावी. मनापासून हे कृत्य करण्याने घराचे रक्षण होते. घरावरील संकटे टळतात. घरातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. पण पारद शिवलिंग घरात ठेवताना शिवपुराणात नमूद असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.





पारद शिवलिंगाची दररोज मनापासून पूजा केल्या पितृदोष दूर होण्यास मदत होते.

अस्वीकरण : नमूद माहिती गृहितके, चालीरीती, रुढी, परंपरा यांच्यावर आधारित आहे. या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक उपयुक्त ठरेल.
Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

डम्पिंगच्या कचऱ्यातील गुलाबजाम खाल्ल्याने मुलीला विषबाधा

कल्याण (प्रतिनिधी): कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता डम्पिंगच्या