क्वालालंपूर : प्रजासत्ताक दिनी भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयासह सलग चार सामने जिंकणाऱ्या भारताने दिमाखात १९ वर्षांखालील टी २० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत आठ बाद ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६६ धावा केल्या आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.
भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…