मुंबई : लग्नाच्या तब्बल २० वर्षानंतर वीरेंद्र सेहवागचा घटस्फोट होणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर तसेच माध्यमांमध्येही सुरू आहे. यामुळे सेहवागच्या चाहत्यांकडून प्रश्नांचा भडीमार होत आहे.
इंस्टाग्राम वरील ट्रोलर्सना वैतागलेल्या सेहवागची पत्नी आरती हिने या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी तिचं पब्लिक असलेलं इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे.
असे असले तरीही आरतीने अजून इंस्टाग्राम प्रोफाइलवरून सेहवाग हे आडनाव काढले नसल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे.