नवी दिल्ली : भारत रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. कर्तव्य पथावर विजय चौक ते इंडिया गेट असे पथसंचन होणार आहे. या सोहळ्यासाठी दिल्लीत सहा पदरी संरक्षण व्यवस्था आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत चोख बंदोबस्त आहे. कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
कर्नाक पुलाचा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार; मे २०२५ पर्यंत बांधकाम होणार पूर्ण
कर्तव्य पथाबाहेरील भागाचे संरक्षण १५ हजार जवान करणार आहेत. यात दिल्ली पोलीस, राखीव पोलीस कंपन्यांचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान, स्वॅट कमांडो, बॉम्ब शोधून निकामी करणारे पथक आणि वाहतूक पोलीस यांचा समावेश आहे. दिल्लीत येण्याजाण्याचे सर्व मार्ग सील करण्यात आले आहेत. तपासणी शिवाय कोणालाही दिल्लीत किंवा दिल्लीबाहेर जाण्यास मनाई आहे.
राष्ट्रपती भवन, लाल किल्ला अशा महत्त्वाच्या ठिकाणी निमलष्करी दलाचे जवान बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. दिल्लीत येण्याजाण्याचे मार्ग आणि महत्त्वाचे रस्ते येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी कृत्रिम अडथळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी कोणतेही वाहन बंदोबस्तावरील जवानांच्या परवानगीशिवाय भरधाव वेगाने जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक
मान्यवरांच्या संरक्षणाची जबाबदारी तिन्ही दलाचे निवडक जवान, एनएसजी, केंद्रीय संरक्षण यंत्रणांचे जवान आणि कमांडो यांच्याकडे असेल. मान्यवरांचे संरक्षण करणारे जवान आणि कमांडो हे थेट नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून त्यांचे कर्तव्य बजावणार आहेत.
दिल्लीतील हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नियंत्रण कक्षातून बारीक नजर ठेवली जाईल. दिल्लीच्या काही भागांमध्ये विमान, ड्रोन आदी आकाशात उडणाऱ्या सर्व उपकरणांना आणि यंत्रांना कायमस्वरुपी बंदी आहे. ही बंदी कायम राहील. या व्यतिरिक्त उर्वरित दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळा होईपर्यंत विमान, ड्रोन आदी आकाशात उडणाऱ्या सर्व उपकरणांना आणि यंत्रांना बंदी असेल. फक्त हवाई कसरती करणाऱ्या विमानांना आणि पुष्पवृष्टी करणार असलेल्या हेलिकॉप्टरना विशिष्ट कालावधीत, विशिष्ट भागातून उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त संरक्षण यंत्रणांचे ड्रोन काही भागांमध्ये उड्डाण करतील.
श्वान पथके आणि बॉम्ब शोधून निकामी करणारी पथके ठिकठिकाणी तैनात असतील. दिल्लीतील अनेक मोठ्या इमारती २५ जानेवारीपासूनच येण्याजाण्यासाठी बंद केल्या जातील. या इमारतींच्या आवारात बंदोबस्त असेल. संपूर्ण कर्तव्य पथावर ठिकठिकाणी स्नायपर्सची नियुक्ती केली जाईल. खबरदरीचा उपाय म्हणून दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निवडक ठिकाणी विमानवेधी तोफा आणि ड्रोनवेधी बंदुका तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीत अनेक चेहरे तपासून ओळख पटविणारे फेस रेकग्निशन सिस्टीम सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एका विशेष सॉफ्टवेअरमध्ये तुरुंगात नसलेल्या हजारो धोकादायक व्यक्तींचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. हे सॉफ्टवेअर फेस रेकग्निशन सिस्टीम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने कोणतीही धोकादायक व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या आसपास नसेल याची खात्री करुन घेणार आहे. संरक्षण यंत्रणेने दिल्लीत वारंवार तालीम करुन प्रजासत्ताक दिनी कोणतीही चूक होऊ नये यासाठी काळजी घेतली आहे.