Malad Fire : मालाडच्या खडकपाडा फर्निचर मार्केट परिसरात भीषण आग!

  234

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात आग लागल्याची बातमी समोर आले आहे. आज सकाळी ११ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. गोरेगाव पूर्वेतील रहेजा बिल्डिंगजवळील खडकपाडा फर्निचर मार्केट येथील ५-६ गाळ्यांमध्ये आग लागली आहे.



आग विझविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये ८ अग्निशमन इंजिन, १ वॉटर क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (WQRV), १ क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (QRV), ५ जंबो टँकर (JT), ३ अ‍ॅडव्हान्स्ड वॉटर टँकर (AWTT), अग्निशमन रोबो युनिट, एक ब्रीथिंग अपरेटस (BA) व्हॅन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एक डिव्हिजनल फायर ऑफिसर (DFO), एक अ‍ॅडिशनल डिव्हिजनल फायर ऑफिसर (ADFO), तीन सिनियर स्टेशन ऑफिसर (सिनियर SO) आणि तीन स्टेशन ऑफिसर (SO) यांच्यासह वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी घटनास्थळी उपस्थित आहेत.


दरम्यान, आतापर्यंत आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर