Chopda : चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू!

जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गल्लीत भरधाव येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो
(क्रमांक : MH-३९-J-७४२४) या गाडीने दिड वर्षाच्या प्रियांशी संदिप पाटील या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.



सदर घटना २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा संदिप पाटील या त्यांच्या घरासमोर असलेल्या दुकानात ताक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या मागोमाग प्रियांशी रस्ता ओलांडत होती. याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या चारचाकी गाडीने तिला जोरदार धडक दिली. गाडीच्या पुढील व मागील उजव्या बाजूच्या चाकाखाली प्रियांशी आल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


दरम्यान, या घटनेनंतर मयत प्रियांशीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे आरोपी गाडीचालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत.

Comments
Add Comment

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या

उसतोड पूर्ण झाली आणि घरी परतताना रस्त्यातच परिवाराचा अपघात ; काळीज पिळवटणारी घटना

महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका