Droupadi Murmu : आपली लोकशाही सर्व समावेशक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न


नवी दिल्ली : आपली लोकशाही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. सोबतच ती जगातील सर्वात मोठी, वैविध्यपूर्ण, तरुण, सर्वसमावेशक आणि संवेदनशील लोकशाही असून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.



राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


देशात निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अनुकरणीय कामगिरी केलेल्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार प्रदान केले गेले. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपतींना 'इंडिया व्होट्स २०२४ : अ सागा ऑफ डेमोक्रसी' या पुस्तकाची पहिली प्रतही भेट दिली. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, आधुनिक काळातल्या जगासाठी भारताची लोकशाही म्हणजे एक सर्वोत्तम उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या. जगभरातील अनेक देश आपल्या निवडणूक पद्धती आणि व्यवस्थापनातून शिकवण घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या निवडणुकांमध्ये देशाच्या सर्वसमावेशक लोकशाहीची प्रभावी झलक दिसून येते असे त्यांनी सांगितले.





निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग हे आपल्या समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे निदर्शक आहे असे त्या म्हणाल्या. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मतदारांसाठी मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी, याकरता निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले आहेत. अशा प्रयत्नांमधून निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक आणि संवेदनशील निवडणूक व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मतदानाशी संबंधित आदर्श आणि जबाबदाऱ्या हे आपल्या लोकशाहीचे महत्वाचे पैलू आहेत. निवडणूक आयोगाची मतदार प्रतिज्ञा ही सर्व नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते असे त्यांनी सांगितले.



मतदारांनी लोकशाहीवर अढळ विश्वास ठेवण्यासोबतच, सर्व प्रकारच्या संकुचित विचारसरणी, भेदभाव आणि प्रलोभनाच्या पलीकडे जात आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा ठाम निर्धारही करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. सुजाण मतदारच आपल्या लोकशाहीला बळकटी देत असतात ही बाबही त्यांनी नमूद केली. भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून २०११ सालापासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आहे.

Comments
Add Comment

Amazon Flipkart Sale Discount Reality : Amazon-Flipkart च्या सेलमध्ये ७०% डिस्काउंटचा झगमगाट! पण ऑर्डर करण्यापूर्वी 'हा' फंडा समजून घ्या, अन्यथा खिसा होईल खाली!

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) औचित्य साधून Amazon, Flipkart आणि Myntra यांसारख्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य

ONGC Russia Venezuela oil wells : कच्च्या तेलाच्या बाजारात भारताची मोठी झेप! व्हेनेझुएला अन् रशियातील तेल विहिरींवर आता ONGC चे वर्चस्व

नवी दिल्ली : जागतिक इंधन बाजारात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा प्रभाव अधिक मजबूत करणारी एक अत्यंत महत्त्वाची

Resident Doctors Strike High Court Verdict : "काम नसेल तर पगार..."; संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई : होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी

Tarun Tejpal : मोठी बातमी! 'तहलका'चे संस्थापक तरुण तेजपाल यांना १० वर्षांचा तुरुंगवास

२०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पणजी : प्रसिद्ध 'तहलका' मासिकाचे संस्थापक तरुण