Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीChopda : चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू!

Chopda : चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू!

जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गल्लीत भरधाव येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो
(क्रमांक : MH-३९-J-७४२४) या गाडीने दिड वर्षाच्या प्रियांशी संदिप पाटील या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

Droupadi Murmu : आपली लोकशाही सर्व समावेशक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदर घटना २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा संदिप पाटील या त्यांच्या घरासमोर असलेल्या दुकानात ताक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या मागोमाग प्रियांशी रस्ता ओलांडत होती. याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या चारचाकी गाडीने तिला जोरदार धडक दिली. गाडीच्या पुढील व मागील उजव्या बाजूच्या चाकाखाली प्रियांशी आल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर मयत प्रियांशीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे आरोपी गाडीचालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -