Tooth and Dare Game : 'टूथ अँड डेअर गेम तरुणीला भोवला'; गेम हरली आणि...

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतोच पण अलीकडे पुणे शहर गुन्हेगारी क्षेत्र बनतं चाललंय. दिवसाढवळ्या गोळीबार, ड्रिंक अँड ड्राईव्ह, आत्महत्या या अशा घटनांमध्ये पुणे मागे राहिलेलं नाही. पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. याच विद्येच्या माहेरघरात हृदय पिळवटून टाकणारी बातमी आली आहे. 'ट्रूथ अँड डेअर' च्या गेम मध्ये हरलेल्या १७ वर्षीय तरुणीवर २२ वर्षीय मित्रांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


पिंपरी- चिंचवड येथे शिक्षणाच्या निमित्ताने १७ वर्षीय तरुणी राहत होती. पाच वर्षांपूर्वी पीडित मुलीची आणि एका २२ वर्षीय तरुणीची 'इन्स्ट्राग्राम'वर ओळख झाली. मंगळवारी या तरुणीचा पीडितेला फोन आला. 'मला घरातून बाहेर काढले आहे. राहण्यासाठी जागा मिळेल का,' असं विचारल्यावर पीडित मुलीने एका दिवसासाठी तिला रूमवर बोलावले.



मंगळवारी तरुणी पीडितेच्या रूमवर आली. मात्र, रात्री मित्राचा फोन आल्याने ती त्याला भेटायला गेली. तिथे तिचा मित्र आणि त्याचे दोन साथीदार दारू पित होते. रात्री ११च्या सुमारास पीडित मुलीने मैत्रिणीला फोन करून, 'घरी ये, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे,' असे सांगितले. मात्र, तरुणीने प्रमाणाबाहेर दारूचे सेवन केले होते. त्यामुळे तू घ्यायला ये असे तिने सांगितले. तरुणीचे इतर दोन मित्र अल्पवयीन मुलीला आणण्यासाठी गेले. कारमधून ते रावेत येथील फ्लॅटवर आले. तेथे गेल्यावर तरुणीने अल्पवयीन मुलीला दारू पिण्याचा आग्रह केला. यामुळे अल्पवयीन मुलगीही दारू प्यायली. पीडित अल्पवयीन तरुणी, तिची मैत्रीण, मैत्रिणीचा मित्र आणि मित्राचे दोन मित्र असे पाच जण दारू प्यायले. दारूची नशा चढल्यानंतर त्यांनी 'टूथ अँड डेअर' गेम खेळायचे ठरवले.



या गेममध्ये जो हरेल त्याने समोरचा सांगेल ते करायचे असे ठरले होते. या गेममध्ये पीडितेची मैत्रीण हरली. मात्र संबंधित मैत्रिणीला उलटी झाल्याने तिचे मित्र तिला बाथरूम मध्ये घेऊन गेले तर दुसऱ्या बाथरूमध्ये पीडित मुलगी गेली असता तिच्यामागे दारूच्या नशेतील मैत्रिणीचा मित्र आला. तेथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. त्याच वेळी पीडित मुलीच्या मोबाइलमधून तिच्या प्रियकराला फोन लागला.दोघांमधील संभाषण फोनवर त्याने ऐकले आणि त्याने पीडितेच्या घरच्यांना कळवताच पीडितेच्या पालकांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द