रोहित शर्माचा रणजी ट्रॉफीत फ्लॉप शो

मुंबई : भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने अपयशी होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ रणजी स्पर्धेतही अपयश रोहितची पाठ सोडताना दिसत नाही. मुंबईत वांद्रे येथे असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर हा रणजी ट्रॉफीतील कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात रोहितने दोन डावात मिळून ३१ धावा केल्या. पहिल्या डावात फक्त तीन धावा करणारा रोहित दुसऱ्या डावात २८ धावा करुन बाद झाला. रोहितने तीन षटकार आणि दोन चौकार मारुन छान सुरुवात केली. पण ३५ चेंडूत २८ धावा करुन तो युधवीर सिंगच्या चेंडूवर आबिद मुश्ताककडे झेल देऊन परतला.



रोहित शर्माने २०२४ मध्ये कसोटी क्रिकेट या प्रकारात एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. पण अनेक सामन्यात तो अपयशी ठरला आहे. रणजी क्रिकेटमध्ये रोहितचा खेळ सुधारेल अशी शक्यता वाटत होती. पण प्रदीर्घ काळानंतर रणजी खेळत असलेला रोहित शर्मा पहिल्या सामन्यात फलंदाज म्हणून अपयशी ठरला. यामुळे रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेत नाही ? या चर्चेला उधाण आले आहे.



कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या डावात ५२ धावा केल्या. यानंतर अद्याप त्याला अर्धशतक करणेही जमलेले नाही. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. पण मागील काही सामन्यांमध्ये रोहितचे अपयश ठळकपणे दिसले आहे. यामुळे रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रोहित शर्माची २०२४ मधील २० डावांतील कामगिरी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ३ आणि ९ धावा - डिसेंबर २०२४ - मेलबर्न
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १० धावा - डिसेंबर २०२४ - ब्रिस्बेन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ३ आणि ६ धावा - अॅडलेड
भारत विरुद्ध न्यूझीलंड - १८ आणि ११ धावा - नोव्हेंबर २०२४ - मुंबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड - शून्य आणि ८ धावा - ऑक्टोबर २०२४ - पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २ आणि ५२ धावा - ऑक्टोबर २०२४ - बंगळुरू
भारत विरुद्ध बांगलादेश - २३ आणि ८ धावा - सप्टेंबर २०२४ - कानपूर
भारत विरुद्ध बांगलादेश - ६ आणि ५ धावा - सप्टेंबर २०२४ - चेन्नई
भारत विरुद्ध इंग्लंड - १०३ धावा - मार्च २०२४ - धर्मशाळा (धरमशाला)
भारत विरुद्ध इंग्लंड - २ आणि ५५ धावा - फेब्रुवारी २०२४ - रांची

रणजी ट्रॉफी स्पर्धा, जानेवारी २०२५
मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर
नाणेफेक जिंकून मुंबईचा फलंदाजीचा निर्णय
मुंबई पहिल्या डावात सर्वबाद १२० धावा
जम्मू काश्मीर पहिल्या डावात सर्वबाद २०६ धावा
मुंबई दुसऱ्या डावात ७ बाद २७४ धावा
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
शार्दुल ठाकूर नाबाद ११३ धावा
तनुष कोटिअन नाबाद ५८ धावा
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत