Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Nutrition Food : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! सांगोल्यात पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या

Nutrition Food : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! सांगोल्यात पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या

सोलापूर : शालेय पोषण आहारात अळ्या, किडे, झुरळे आणि उंदरांच्या विष्ठा आढळ्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा सोलापूरमध्ये (Solapur News) अशीच घटना घडल्याचे समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी (Nutrition Food) वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदाराच्या लेंड्या आढळल्या आहेत. सातत्याने होणारे असे प्रकार पाहता प्रशासन अद्यापही अ‍ॅक्शन मोडवर आले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.



सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे अंगणवाडी आणि प्राथामिक शाळेतील विद्यार्थ्यांना तांदळाबरोबर इतर साहित्य दिले जाते. याच तांदळासह इतर धान्यामध्ये उंदाराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्या आहेत. शाळेजवळील गोडावूनमध्ये शालेय पोषण आहाराची साठवण करण्यात आली आहे. मात्र त्याचठिकाणी उंदीर आणि घुशींचा वावर असल्यामुळे उंदरांनी मोठ्या प्रमाणात तांदळाची नासाडी केली आहे.


सांगोल्यातील सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी रात्री येथील गोडाऊनमधील निकृष्ट धान्याची वस्तुस्थिती समोर आणली. या घटनेनंतर गट शिक्षणाधिकार्यांनी पोषण आहाराचे गोडाऊन सील केले आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment